लोक न्यूज-
अमळनेर मांडळ ते तांदळी रस्त्यावर लहान पुलाच्या बांधकामाचा आमदार पाटील यांच्या हस्ते शुभारंभ बुधवारी करण्यात आला.
तालुक्यातील तांदळी येथे प्रजिमा 53 किमी 81/ 00 किमी अंतरावर असलेल्या लहान पुलाच्या विकास कामाचे बांधकाम आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले
तालुक्यातील पांझरा काठावरील मांडळ मुडी ब्राम्हणे भिलाली शहापूर रस्त्यावर तांदळी गावाजवळ हा पूल बांधकाम विकास कामाचे भूमीपूजन झाले. तालुक्यात विविध विकास कामांचा धडाका सुरू ठेवला असून वाहनधारकांना छोट्या मोठ्या नाल्यांमुळे वाहतुकीस व्यत्यय येतो ही बाब पाहता या मंजूर कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी उपस्थित तांदळीच्या सरपंच चैताली परदेशी, उपसरपंच शोभाबाई भिल, कुणाल पाटील, स्वप्निल परदेशी बाजार समितीचे प्रशासक तथा उपसरपंच कळमसरे जितेंद्र राजपुत, बाजार समितीचे प्रशासक एल टी पाटील, शहापुरचे डॉ.भानुदास पाटील, शहापुर ग्रा.पं.सदस्य कैलास पाटील, निलेश पाटील, भुषण पाटील, सुनिल परदेशी, हबाल परदेशी, देवीदास देसले उपस्थित आदी उपस्थित होते.