लोक न्यूज-

नुकतेच भाजपा शहर व ग्रामीण भागात वाढवणारे उदय वाघ यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे त्यांना सर्वपक्षाने जाहीर श्रध्दांजली वाहिली पण अमळनेर  कृ. बा. समितीत प्रशासक मंडळ नियुक्त झाले त्यानंतर कृ. बा. समिती कार्यालयातून युवकांचे प्रेरणा स्थान कै. उदय बापू वाघ यांचे छायाचित्र हटवल्याने भाजपचे असंख्य कार्यकर्ते नाराज झाले आहेत. 
              कै. उदय वाघ यांनी कृ. बा. समितीचे सर्व सेवा झाल्यावर अनेक महत्वाची कार्य केली.त्यात जिल्हा बँक अमळनेर कृ. बा. समिती आवारात स्थलांतर केली,शेतकऱ्यांचा माल उतरविण्यासाठी मोठी कैची शेळ व T.M.C. शेळ उपलब्ध करून दिले,पेमेंट घेण्यासाठी आडत दुकानाच्या सुविधायुक्त इमारत उभारल्या,शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली,आधुनिक शौचालय व स्वच्छता गृह उभारली,    वार्डवर मोजण्यासाठी भुई काटा उभारला, बाजार समितीतील सर्व कर्मचारी चोक पणे व तत्परतेने वागतात का याकडे त्यांचे लक्ष नेहमी असायचे,आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमालाचे अधिक उत्पादन काढून शेती व कृषी क्षेत्राला प्रेरणा देणाऱ्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्याना "कृषिरत्न" पुरस्कार योजना राबविली असे कार्यकरणाऱ्या व भाजपा तळगाळत वाढविणाऱ्या प्रसंगी अनेक हाल अपेष्टा सहन करणाऱ्या व अनेक राजकीय विरोधकांवर मात देणाऱ्या  कै.उदय वाघ यांचे छायाचित्र हटविल्याने भाजपात असंतोष वाढला आहे.
       काही कार्यकर्ते आमदारांच्या कार्यशैलीवर नाराज असून त्यांनी याबाबत लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
     याबाबत अनेकांनी आपली नाराजगी लोक न्यूजला व्यक्त केली.