लोक न्यूज-प्रशांत गिरासे
शिवनी जिल्हा नांदेड येथील बौद्ध तरुणावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशा आशयाचे निवेदन देवळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना देवळा पोलीस ठाण्याच्या मार्फत देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की,नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असलेले शिवनी जामगा येथील बौद्ध तरुण गणेश एडके यांच्यावर तेथील जातीयवादी गाव गुंडांनी मारहाण करून जबर जखमी केले आहे.गणेश एडके हे दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहेत.स्थानिक प्रशासनाने व सरकारने या प्रकरणात जातीने लक्ष घालून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही विनंती.या जातीयवादी कृत्याचे आम्ही देवळा तालुका वंचित बहुजन आघाडी व मालेगाव जिल्हा पूर्वच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत.
निवेदनावर मालेगाव जिल्हा पूर्वचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा जाधव,राहुल बच्छाव,किरण बच्छाव,वैभव केदारे आदींच्या सह्या आहेत.