लोक न्यूज(रिपोर्ट)

सविस्तर असे की,
अमळनेर तालुक्यातील एकतास येथील रहिवासी  बी.पी.एल. कार्ड धारक शंकर विठ्ठल नाथबुवा हे आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर गावाला भंगार जमा करण्याचा व्यवसाय करतात, एकतास या गावाला शासनाचे मोफत आलेले रेशन घेण्यासाठी त्यांच्या मुलीला पाठवले होते, परंतु रेशन दुकानदाराने मनमानी करत उडवाउडवीची उत्तरे दिली,5 ऑगस्ट पर्यंतच मुदत होती.मुदत संपली तुम्हाला रेशन मिळणार नाही. या दुकानदाराने नाथबुवा परिवाराचे मोफत आलेले रेशन काळ्या बाजरात दिले की काय? असा सवाल या परिवारा समोर उभा होता. 
        
असे लोक न्युजशी बोलतांना त्या मुलीने सांगितले होते.

            लोक न्युजला बातमी प्रसिध्दी होताच नाथबुवा परिवाराला दुसऱ्या दिवशी त्या रेशन दुकानदाराने मोफत आलेले धान्य दिले. असे लोक न्युजला मोबाईल फोन द्वारे नाथबुवा परिवार कडून सांगण्यात आले.

      प्रत्येक परिवाराला तीन महिनीच्या तीन किलो दाळ शासना कडून मोफत देण्यात आली आहे. 
          परंतु त्या दुकानदाराने कोणाला दोन किलो तर कोणाला एक किलो अशी दाळ वाटप करण्याचे समजते.