अमळनेर (रिपोर्ट)
शुक्रवारी तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा पातोंडा येथे संरक्षण भिंतीच्या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार अनिल भाईदास पाटील , पातोंड्याच्या सरपंच रेखाताई किशोर मोरे पाटील, उपसरपंच सोपान भाऊ लोहार, माजी उपसरपंच संदीपराव भगवंतराव पवार, पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक व महिला प्रदेश सचिव रिता बाविस्कर, काॅग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गोकुळ आबा बोरसे, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुरेश पाटील, दापोरी माजी सरपंच एल. टी.पाटील यांच्या उपस्थितीत झाले.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप बिरारी.जयवंतराव पवार, विनोद पवार, प्रशांत पवार, राजेंद्र यादव, प्रवीण बिरारी, अशोक पवार, रमेश ठाकरे, गजानन बिरारी, राहुल पवार, सयाजी भगत, गणेश पवार, कु. चैताली बाविस्कर, राजन पाटील, वाल्मिक पवार मगन बोरसे, मेहरू पवार, प्रवीण लाड, राजेद्र यादव, तोताराम बहिरराव, श माळी सर, विलास चव्हाण, सयाजी बोरसे इत्यादी.आणि मुख्याध्यापक सह शिक्षक वर्ग उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन विलास चव्हाण यांनी केले.
यावेळी पातोंडा येथील संरक्षण भिंतीसाठी पूर्ण निधी उपलब्ध करून देऊ आणि पूर्ण काम मार्गी लावुन जि. प.शाळेच्या मुला मुलींसाठी सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी गावाला दिले होते. ते पूर्ण केले. व त्याप्रमाणे 19 लाख रुपयांचा निधी मंजूर करून अत्यंत महत्त्वाचे काम पातोंडा येथील जि. प.संरक्षण भिंतीचे काम होते ते पूर्ण केले आणि त्यासाठी भूमिपूजन आज रोजी शुक्रवारी करण्यात आले.