अमळनेर(रिपोर्ट)-  18 जुलै हा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा निर्वाण दिन असल्याने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी  आमदार अनिल पाटील मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील,न.प.च्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,संजय चौधरी,संजय मरसाळे,हरिश्चंद्र कढरे सर,समाधान मैराळे,नारायण गांगुर्डे,भाऊसाहेब जगदाने आदी उपस्थित होते.
       अण्णाभाऊ साठे यांनी दीन, दुर्बल,शोषित,पीडित,उपेक्षित,
कामगार,वंचितांच्या दुःखाला आपल्या साहित्यातून ,शाहिरीतून वाचा फोडली आहे.अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये शाहिरीच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान दिले आहे.कष्टकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न  सोडवण्यासाठी त्यांनी अवघे आयुष्य खर्ची घातले.अशा महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना शहरातील  अण्णाभाऊ साठे प्रेमींनी  अभिवादन केले.