अमळनेर-
तालुक्यातील धार येथील ग्रामसेवक यांना निवेदन....
माझा ग्रामपंचायतीचा 6 महिन्याचा मासिक बैठक भत्ता कोरोना ग्रस्त नागरिक व कोरोणामुळे अडचणीत आलेले हातमजुर यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यक निधी मध्ये जमा करण्यात यावी
मी मनोहर सुधाकर पाटील ग्रा.प.सदस्य धार तथा तालुका संघटक देवा गृप फाऊंडेशन अमळनेर तालुका सध्या कोरोना या विषाणुमुळे देशावर मोठे संकट निर्माण झाले आहे त्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे या संकाटासोबत मुकाबला करण्यासाठी गाव पातळी वरील लोक प्रतिनिधी आपली सामाजिक व नैतिक जबाबदारी ओळखुन आप आपल्या परीने सरकार ला सहकार्य करणे मला गरजेचे वाटते म्हणुन मी माझ्या 6 महिन्याचा मासिक बैठक भत्ता मुख्यमंत्री सहाय्यक निधी महाराष्ट्र शासन यांना देण्यात यावी ही नम्र विनंती