शेतकरी बांधवांनी शेतकी संघात ऑनलाइन नोंदणी करावी
अमळनेर-ज्वारी व मका खरेदी केंद्र अमळनेर येथे येत्या आठ दिवसात सुरू होणार असून यासाठी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी अमळनेर शेतकी संघात ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन आ.अनिल पाटील यांनी केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की सदर खरेदी केंद्र लवकर सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला असून अमळनेर येथे बारदान आणि गोडाऊन उपलब्ध झाल्यानंतर लागलीच हे खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे.शेतकरी बांधवाना माल विक्रीसाठी नोंदणी आवश्यक असल्याने सदरची ऑनलाइन नोंदणी अमळनेर शेतकी संघात करावी असे आवाहन आमदारांनी केले आहे.