अमळनेर : तांबेपुरा सानेनगर भागातील आपली माती आपली माणसे या अज्ञात ग्रुपने आपली नावे प्रसिद्धी न करता अपंग , विधवा महिला , निराधार आणि जर्जर वृद्ध अशा 80 कुटुंबांना 4 महिन्याकरिता दत्तक घेतले असून दर महिन्याला किराणा सामान घरपोच देण्यात येत आहे  
      तांबेपुरा सानेनगर भागात काही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने काही परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे  या परिसरातील मजुरांची कर्मचाऱ्यांची कामे बंद  झाल्याने विधवा महिला , अपंग व्यक्ती , आणि निराधार जर्जर वृद्ध व्यक्तींना उपजीविका करणे कठीण झाल्याने या परिसरातील   तरुणांच्या आपली माती आपली माणसे या  एका ग्रुपने आपल्या पदराचा पैसे गोळा करून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्व्हे केला आणि खऱ्या गरजू 80 कुटुंबाची यादी तयार करून त्यांना येत्या चार महिन्याकरिता दत्तक घेतले त्यांना तेल , तूरडाळ , मुगडाळ , उडीद डाळ , तिखट , हळद , मसाला , साबण , बिस्कीट पुडा , गहू , तांदूळ असे साहित्य घरपोच देण्यात आले प्रातिनिधीक स्वरूपात प्रांताधिकारी सीमा अहिरे , तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या हस्ते पाच कुटुंबाना किराणा मालाच्या पिशव्या वाटण्यात आल्या विशेष म्हणजे आपली माती आपली माणसे या ग्रुपने आपली नावे जाहीर केलेली नाहीत  एरवी लोकांकडून पैसे गोळा करून स्वतःच्या नावाने फोटो काढून चमकोगिरी करणाऱ्यांना उत आला असतांना खऱ्या गरजूंना मदत करून प्रसिद्धी पासून लांब राहिल्याने आपली माती आपली माणसे  या ग्रुपचे  सर्वत्र कौतुक होत आहे.