अमळनेर (रिपोर्ट) 
 प्रथमेश संजय बाविस्कर या छोट्या मुलाने आपल्या वाढदिवसानिमित्त 3 हजार रुपयांचा धनादेश आमदार अनिल पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला आहे. 
हा देश माझ्या साठी मी देशासाठी हि भावना मनाशी बागळून व सध्या जगात कोरोनाचा धुमाकुळ चालु असतांना , शासन स्तरावर कोरोना शी लढा चालू आहे ह्या लढ्यात शासनाला नागरिकाकडून तन मन धन ची अपेक्षा असने साहजिक असते. व त्यात आपला वाटा असावा अशा विचार . प्रथमेश संजय बाविस्कर याच्या मनात होता विचार साकार करण्यासाठी प्रथमेश ने आपला वाढदिवस साजरा न करता खर्च होणारी रक्कम शासनाला देण्याचा विचार वडीलाकडे बोलून दाखवला प्रथमेशची कल्पना घरातील सर्व सदस्यांना आवडली. त्या रकमेचा मुख्यमंत्री कोविड सहाय्यता निधी असा धनादेश प्रथमेश व वडील संजय बाविस्कर यांनी अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या कडे सपूर्द केला. वाढदिवसाचे औचीत्य साधुन कोविड फंडात मदतीचा धनादेश दिला आहे. त्याबद्दल आमदार पाटील यांनी त्याचे कौतुक केले आहे.