अमळनेर: शहर निर्जंतुक करून कोरोंटाइन सेन्ट्रल ला भोजन व गरम पाण्याची सोय माजी आमदार शिरिषदादा चौधरी व हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ.रवींद्र चौधरी हे स्वतःचे 10 लाख रु. खर्च करून ही सोय करून देणार आहेत.
  सोमवारी दि.11 रोजी सकाळी 10 वाजेपासून अमळनेर शहर सॅनिटाईझर केले जाणार आहे त्यासाठी आधुनिक पद्धतीचे मशीन आणले असून 



दहा फूट उंच व आजू बाजूस 20 फूट पर्यंत फवारणी करण्याची क्षमता असलेले हे यंत्र आहेत. .संपूर्ण विभागात असे मशीन नाही हे विशेष! पहिल्या टप्प्यात 1000 लिटर रसायन आणले आहे. 
यावरील तज्ञ असलेल्या कर्मचाऱ्यांचा खर्च ही चौधरी बंधू करणार आहेत.या अगोदरही शेतीला पाणी हाताला काम हे स्लोगन वापरून चौधरी बंधूंनी लाखो रुपये खर्च केले आहेत.आम्ही या भूमीचे देणं लागतो व कायम कृतज्ञ राहू अश्या प्रतिक्रिया डॉ. रवींद्र चौधरी यांनी दिल्या आहेत.
    कोरोंटाइन केलेल्या लोकांना जेवणाची तुटपुंजी व्यवस्था असून अनेक लोकांचे घरून डबे येतात असे कोरोंटाइन सेन्टर चे चित्र असून येथे महिनाभर भोजन व्यवस्था व गरम पाण्याची सोय चौधरी बंधू करून देणार आहेत.