नंदुरबार शहरातील 48 वर्षीय एक रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. हा रुग्ण वॉर्ड क्रमांक 10 भागातील आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून अली साहेब मोहल्ला भागाच्या एक किलोमीटर परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून त्याच्या 1 ते 2 किलोमीटर परिसरात कोणत्याही वाहनास अनुमती नसेल, तसेच कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाहीत. नंदुरबार शहरातदेखील संचारबंदीचे कठोरपणे पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता घरातच राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अनावश्यक बाहेर फिरताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे.