अमळनेर(प्रतिनिधी)
अमळनेर जि. जळगाव येथील नाभिक समाज पंच मंडळातील सर्व पदाधिकारी यांनी शहरातील सर्व सलून दुकान बांधवाना, त्यांच्या दुकानात जाऊन तोंडाला मास्क बांधून, स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली.त्यामुळे अमळनेर मधील सर्व समाज बांधव चांगल्या प्रकारे जागरूक झाल्याचे दिसून आले.
त्यावेळी उपस्थित असलेले पदाधिकारी अध्यक्ष श्री.मधुकर आबा सैंदाणे,उपाध्यक्ष श्री.नंदलाल भाऊ जगताप,खजिनदार श्री.दिलीप भाऊ सोनवणे,सचिव श्री.सीताराम भाऊ बोरसे
जेष्ठ समाज सेवक व विश्वस्त श्री.रघुनाथ नाना खोंडे,जेष्ठ सल्लागार श्री.भिकन दादा सैंदाणे
विश्वस्त श्री.धनराज भाऊ नेरपगारे,विश्वस्त श्री.अशोक भाऊ सूर्यवंशी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.