बीड, वार्ताहर ,
धर्मापुरी रोड वरील कोरोमंडल किंग सिमेंट कंपनीने कोरोना बाबत काय उपाय योजना केल्यात याची माहिती घेण्यासाठी गेलेले स्थानिक पत्रकार दत्तात्रय काळे, महादेव शिंदे यांना गेटवर अडवून अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला,यातील जख्मी पत्रकारांला रुग्णालयात दाखल केले आहे.या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार अज्ञात व्यक्तींविरोधात परळी शहरातील संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात  कोरोनाने विषाणूचा संसंर्ग रोखण्यासाठी  प्रशासनान विविध उपाययोजना करत आहे.सर्वांनी मास्क वापरावे, बाहेरून येणाऱ्यांची नोंद, तपासणी करावी अशा सुचना आहेत. या पार्श्वभूमीवर परळी शहर दै. मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे, दै. युवासोबतीचे तालुका प्रतिनिधी महादेव शिंदे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी संभाजी मुंडे आदी माध्यम प्रतिनिधीनी दि. 20 मार्च रोजी सिमेंट कारखान्याला भेट देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना  गेटवर अडवले गेले.  पत्रकारांनी,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी कशाप्रकारे घेत आहात? मास्क का लावला नाही?असे विचारले  तेव्हा तिथे उपस्थित काही अज्ञात व्यक्तींनी तुम्ही प्रश्न विचारणारे कोण असे म्हणत अचानक हल्ला चढविला. 
यात दत्तात्रेय काळे व महादेव शिंदे यांनी दुखापत झाली असून त्यांनी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा पत्रकार संरक्षण कायदा अधिनियम 2017 तथा भा. द. वि. कलम 323, 504, 506 व 34  अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  पुढील तपास जिल्हा पोलीस उपाधीक्षक राहुल धस करत आहेत. दरम्यान सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेचा 
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे,प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, विश्वास आरोटे यांनी  निषेध केला असुन दोषींवर कारवाई ची मागणी केली आहे.