कळमसरे....
ता.अमळनेर-
शहापूर ता.अमळनेर येथून भगवान महाराज शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर व परिसरातील भाविकांनी शहापूर ते पैठण 21 वी पायी वारीला काल ता.1 रोजी प्रस्थान केले.यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य जयश्री पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी ता.29 रोजी रात्री साडे आठ वाजेला गुलाबराव महाराज लोणकर यांचा कीर्तन श्रवणाचा कार्यक्रम गौरेश्वर मंदिरात झाला. काल ता.1 रोजी वारीला प्रस्थान करण्या अगोदर गावातील सुकराम पाटील यांच्याकडे पायी वारीतील भाविकांनी महाप्रसाद घेऊन पायी वारीला सुरुवात केली.
या पायी वारीला बळीराम महाराज शहापूरकर,व बहुसंख्य वारकरी यावेळी उपस्थित होते. मागील एकवीस वर्षांपासून शहापूर ते पैठण अखंड पायी वारी सुरू असून ती परंपरा दिगंबर महाराज यांचे पठयशिष्य भगवानजी महाराज यांनी सुरू ठेवली आहे.