दिनांक 19 फेब्रुवारी रोजी नगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने चोपडा येथील शिव व्याखाते प्रा.संदीप पाटील यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची गुंफण करताना शिवाजी महाराज हे खरे रयतेचा जाणता राजा होते. रयतेचा अर्थ उलगडत महाराजांच्या कार्य विषयी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी नगाव गावातील विद्यावाचस्पती पदवी (Ph.D)प्राप्त केलेले डॉ.राजेंद्र जाधव कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,सोनगीर तसेच डॉ.माणिक बागले,किसान महाविद्यालय,पारोळा यांचा समस्त ग्रामस्थ नगाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रसंगी त्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार आचरणात आणून शिवभक्त झाले पाहिजे आणि गावाचा विकास करण्यासाठी मानसिकता बदलून सर्वांनी गाव विकाससाठी सहकार्य केले पाहिजे तेव्हाच गावाचा विकास होईल असे संबोधित केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ग्राम पंचायतचे सरपंच श्री महेश पाटील यांनी शिवकार्य सांगून महिलांचे संवर्धन व सन्मान केला पाहिजे हे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य श्री.विनोद जाधव नगाव ग्राम पंचायत उपसरपंच देवीदास पाटील,विजय पाटील,अशोक नाना,दिनेश पाटील,शरद पाटील,मगण नाईक,राजेंद्र पाटील,विनोद सर सर्व ग्राम पंचायत सदस्य,चुडामन सर,ग्रामसेवक श्री.देसले पोलीस पाटील श्री. प्रवीण गोसावी गावातील जेष्ठ श्रेष्ठ नागरिक महिला वर्ग उपस्थित होता.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील शिव कार्यकर्त जगदीश रामदास पाटील व त्यांचे सहकारी यांनी मेहनत व परिश्रम घेतले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री खंडेराव शांताराम पाटील यांनी केले.
शिव व्याख्यान नंतर गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली.