अमळनेर-अमळनेर सारख्या लहानशा शहरात असताना अनेकदा मोठ्यात मोठ्या चॅलेंजिंग शस्त्रक्रिया यशस्वी करणारे अमळनेरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ अनिल शिंदे यांनी कॅन्सरच्या गाठीची मोठी शस्त्रक्रिया नुकतीच करून अतिशय सामान्य कुटुंबातील असलेल्या 62 वर्षीय महिलेस जीवदान दिले.
           डॉ.अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाऊंडेशन येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली.यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की सौ मीराबाई पाटील,रा.मुडी प्र.ताअमळनेर यांचे पोट फुगून संडासाच्या जागी गाठ व मोठ्या आतड्याचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते त्यास मेडिकलच्या भाषेत सिग्माईड-कोलॉन असे संबोधले जाते,यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉ शिंदे यांनी घेतला होता,प्रत्यक्षात दोन टप्प्यात ही शस्त्रक्रिया दोन टप्प्यात करणे आवश्यक असते,परंतु रुग्णाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने दोनदा शस्त्रक्रिया करण्याचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता यामुळे एकाचवेळी दोन्ही शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या पैश्याची बचत करण्याचा निर्णय डॉ शिंदे यांनी घेतला रुग्णाच्या नातेवाईकांनी देखील यास संमती दिल्याने सुमारे साडेचार तासात डॉ शिंदे यांनी ही शस्त्रक्रिया पूर्ण केली.यात महिलेच्या कॅन्सर गाठीच्या दोन्ही बाजूला असलेले 6/6इंच असे एकूण 1 फूट आतडे डॉ शिंदे यांनी काढले,अतिशय आव्हानात्मक असलेल्या या शस्त्रक्रियेसाठी डॉ आलिंम शेख,डॉ मयुरी जोशी,डॉ संदीप जोशी,डॉ महेश पाटील,डॉ महेश रासुरे,डॉ परेश पाटील आदींचे सहकार्य लाभले.महिलेची प्रकृती आता सुरळीत असून पुढील उपचार म्हणजेच केमोथेरपी आणि रेडिओथेरपी साठी या महिलेस नाशिक येथील मानवता क्युरी सेंटरला पाठविण्यात येणार आहे.
           दरम्यान डॉ शिंदे हे असे अनेक आव्हाने स्वीकारून अनेक गंभीर आजारांच्या शस्त्रक्रिया त्यांच्या नर्मदा  मेडिकल फाऊंडेशन मध्ये करीत असल्याने अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळून त्यांचा आर्थिक भुर्दंड वाचत आहे.