धुळे(प्रतिनिधी)
आज दि.19/3/2020 रोजी संपुर्ण महाराष्ट्र दारू बंदी महीला युवा मोर्चा च्या वतीने मा उपजिल्हाधिकारी सौ. सुरेखा चव्हाण मँडम यांना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता दारू दुकाने ही बंद ठेवण्यात यावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले...
कोरोना हा गर्दीच्या जास्त संपर्काच्या आजार संसर्गजन्य आजार असल्याने शाळा कॉलेज दळवळण व्यवस्था ज्याप्रमाणे खबरदारी म्हणून बंद करण्यात आले आहेत त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या दारू ची दुकाने, बियरबारची अतिवेगाने संसर्ग होणारी दुकाने बंद करण्यात यावी.तसेच गुटखा तंबाखू खाऊन थुंकणा-या , दारू पिऊन धिंगाणा घालणा-या व प्रदुषीत वातावरण करणा-यांवरही कडक दंड आकारण्यात यावा व कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित
दारू बंदी महीला युवा मोर्चा च्या सौ गीतांजली कोळी, डॉ सुजाता आडे, माधुरी शुक्ल, रविंद्र कोळी,प्रकाश पाटील, विमल सोनवणे यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले.