अनिल पाटील




प्रतिनिधी अमळनेर 

अमळनेर मतदार संघातील जनता 2014 मध्ये झालेली घोडचूक यंदा टाळणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे राज्यभर बिकानेर नामकरण झालेल्या अमळनेर जनतेची अस्मिता जागी झाली असून स्थानिक भूमिपुत्र या मुद्द्यावर होणार निवडणूक रंगणार आहे.

बाहेरगावी गेलेल्या नात्यागोत्यातील विकाऊ टिंगल देखील पाच वर्षे बरीच झोंबत आहे 
यंदा बिकानेर नाही तर अमळनेर हे पळवनेर ठरणार आहे.
गेल्या वेळी आपल्या एका मताने काय फरक होईल या अविर्भावात असलेल्या मतदारांना निकालाने धक्का दिला होता परकी व्यक्ती येऊन आपल्या भागात राज करते ही बाबच पाच वर्षे जनता डोळ्यांनी पाहत होती. विकास कामात खोळंबा जातीपातीचे राजकारण वाढले एकमेकांमधील सलोख्यात दुरावा कमी झाला. सामान्य जनता हे चित्र डोळ्यांनी पाहत होती. आपण केलेली चूक किती महागात पडली हे जनतेला कळून चुकले आहे.यामुळे तालुक्यातील जनता अस्मिता आणि भूमिपुत्र या भूमिकेकडे गेली आहे. म्हणून यावेळी अमळनेर करांची गेलेली इभ्रत परत आणण्यासाठी मतदार जागरूक झाले आहेत.काहीही झाले तरी यावेळी आपलं मत अस्मितेला असणार आहे ही भूमिका वाढली आहे. राष्ट्रवादी पक्षाला पूरक अस वातावरण गावागावात वाढू लागले आहे.

स्वतःचा मतदार संघ नसल्याने पाच वर्षात पाडळसरे धरणाचे काम थंडावले कागदोपत्री निधी येत असताना दिसत असूनही ठेकेदार गाशा गुंढाळून गेला आहे. त्यामुळे एक इंचही काम धरणाचे झाले नाही गेल्या पाच वर्षात आघाडी सरकारने पाडाळसरे धरणाचे जे काम केले ते युती शासन पुढे करण्यात कमी पडले स्थानिक आमदारांनी देखील या धरणाला बगल दिली शाळा लाईट अंगणवाड्या रस्ते हे प्रश्न मूलभूत आहेत ते आपोआपच मिळत जाते मात्र जिव्हाळ्याचा प्रश्नावर दुर्लक्ष हे जनतेने पाहिले आहे संघर्ष पेटला आंदोलन मोर्चा झाला पण पाडळसरे धरणाला खोट्या आश्वासने मिळत गेली व पाच वर्षे काहीच काम झाले नाही.