अमळनेर लायन्स क्लबतर्फे
नेहरू मुलींचे वसतिगृहात साहित्य वाटप व आरोग्य तपासणी



चोपडा-( प्रतिनिधी ) :- 


अमळनेर लायन्स क्लब तर्फे चोपडा येथे कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात आदिवासी मागासवर्गीय निकडवंत विद्यार्थीनींना आवश्यक साहित्य वाटप व आरोग्य तपासणी कार्यक्रम घेण्यात आला.
आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थीनींच्या आरोग्य विषयक अनेक दूरलक्षित समस्यांकडे लक्ष वेधून घेत लायन्स क्लबच्या सदस्यांनी डॉ.मंजरी कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी करून सखोल   मार्गदर्शन केले.विविध आजारांची व स्वच्छतेविषयी जागृती निर्माण केली.



 शिवाय वाटर बाॅटल, बिस्किटे,पेढे, कुरकुरे, साबण,दाळ,डस्बीन आदि वापरातील साहित्य देऊन विद्यार्थीनींच्या आनंदात भर पाडली
कार्यक्रमास लायन्स क्लबच्या अध्यक्षा सौ.ममता अग्रवाल,सचिव सौ.सोनल जोशी, डॉ.मंजरी  कुलकर्णी,सौ.जास्मीन भरूचा ,प्रा.सौ. कल्पना शहा,सौ.वर्षा दोडीवाल, वसतीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ,अधिक्षिका कावेरी कोळी,व कर्मचारी उपस्थित होते.