शिंदखेडा
(प्रतिनिधी)--शहरामध्ये खलाणे येथील रहिवासी असलेले विजय टाटिया यांना बाभुळदे येथील महिलांनी सिनेस्टाईल मारहाणीचा प्रकार घडला आहे.महिलांनी वरपाडा चौफुली पासून यासंदर्भात विजय टाटिया यांनी स्वतः शिंदखेडा पोलीस स्टेशनला पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. विरोधी गटाकडून देखील फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते
विजय हरकचंद टाटिया हे खलाणे येथील रहिवासी असून सध्य स्थितीत ते नाशिक येथे आपल्या परिवारासह राहत आहेत. न्यायालयात ते कामानिमित्त शिंदखेडा येथे आलेले असताना काल बाभुळदे(ता.शिंदखेडा) येथील विलास निंबाजी शिंदे व विजय टाटिया यांच्यात प्रॉपर्टीचे वादावरून भांडण होऊन मारहाणीचा प्रकार घडला.
20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कोर्टाच्या कामानिमित्त शहरात विजय टाटिया आलेले होते.बाभुळदे येथील विलास शिंदे हे देखील त्यांच्या परिवारासह कोर्टात हजर होते. दुपारी एक वाजता टाटिया हे आपल्या इतर साथीदारांसह वरपाडा चौफुली येथील वेलकम हॉटेल वर चहा पिण्यासाठी आले असता विलास लिंबाजी शिंदे, प्रतिभा विलास शिंदे, मिराबाई पाटील व भूषण विलास शिंदे व अनिता (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी त्या ठिकाणी येऊन शिवीगाळ केले व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत हे जमीनीवर खाली पडले. अशा आशयाची फिर्याद विजय टाटिया यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. शिंदखेडा पोलिस स्टेशनला भादंवि कलम 307,143,323,504,506 सह मु.पो.का.क.37(1)(3)चे उल्लंघन 135 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.