आ.स्मिता वाघ यांच्या समयसुचकतेने परिसराला मिळणार “जलसंजीवनी”
अमळनेर-पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणात “वरूण” राज्याची कृपा दृष्टी नसल्यामुळे धरणातील जलसाठ्याने तळ गाठला होता.त्यामुळे धरणावर पाणी पुरवठासाठी अवलबून असलेल्या १७ ते १८ गांवाना तीव्र “जलसंकटाला” सामोरे जावे लागत होते.परिसरातील झालेल्या असमाधानकारक पावसामुळे धरणात केवळ मृत साठा शिल्लक होता.
म्हसवे धरण “ओव्हरफ्लो” झाल्याने पाटचारीद्वारे भोकरबारी धरणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.परंतु पाटचारी वर असलेल्या जीर्ण लोखंडी गेट मुळे पाण्याचा प्रवाह अतिशय कमी वेगाने होत होता त्यामुळे भोकरबारी धरण भरण्यास अडचणी येत असल्याने परीसरातील भोकरबारी,कंकराज,शेवगे,शेळावे बु.,हिरापूर,बोदर्डे,वंजारी खु.,येथील नागरिकांनी आ.स्मिता वाघ यांची भेट घेवून गेटजवळ समांतर पाटचारी करून देण्याची मागणी केली आ.वाघ यांनी देखील समयसूचकता दाखवत स्व-खर्चाने याठिकाणी समांतर पाटचारी खोदन्यासाठी पोकल्यान उपलब्ध करून दिले.ह्या समांतर पाटचारी मुळे म्हसवे धरणातील अतिरिक्त पाणी अधिक वेगाने भोकरबारी धरणाकडे पोहचणार असून भोकरबारी धरणाची “मृत” साठ्याकडून “ओव्हर फ्लो” कडे वाटचाल होणार असल्याने आ.स्मिता वाघ यांच्या समयसूचकतेने परिसरातील गांवाना “जलसंजीवनी” उपलब्ध होणार आहे.
दरम्यान,ह्या ठिकाणी आ.स्मिता वाघ यांनी भेट दिली असता नागरिकांनी जल्लोषात आतिशबाजी व वांजत्री सह आ.वाघ यांचे स्वागत करून आभार मानले,यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष उदय वाघ,अमळनेर पंचायत समिती सभापती वजाबाई भिल,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रफुल्ल पवार,श्याम अहिरे,प्रकाश पाटील,जिजाबराव पाटील,झुलाल पाटील,समाधान पाटील,महेश पाटील,विनोद पाटील,विजय पाटील,नाना पाटील,सागर पाटील,पांडुरंग पाटील,सचिन पाटील,ईश्वर पाटील,लाला पाटील,शालिक पाटील,अशोक पाटील,महेंद्र पाटील,मनोज पाटील,विनोद तायडे अभियंता अजिंक्य पाटील, यांच्यसह परीसरातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.