शिरपूरतालुक्यातील सावळदे ते शिरपुर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

त्या रस्त्यामुळे रोज अपघात होत असतात संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन देखील तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेले. 

त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष्याचे जिल्हा अध्यक्ष ईश्वर बोरसे व जिल्हा सचिव स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाने आज दिनांक 20/9/ 2019 रोजी सकाळी 11 वाजता  खंडेराव बाबा मंदिराजवळील पुलवार रास्ता रोको आंदोलन
करण्यात आले त्या वेळेस आंदोलन कर्त्यांना शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले.