लोक न्यूज
अमळनेर:-शहराच्या पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर पालिकेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले असून नुसते आश्वासन नको तर लोकांना प्रत्यक्ष पाणी द्या आणि दोन दिवसात संपुर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा अशी तंबी देऊन यासाठी दोन दिवसांचा अलटीमेंटम दिला आहे.
अमळनेर शहरातील पाणीप्रश्न गेल्या 22 दिवसांपासून गंभीर होऊन नागरिक पाण्यासाठी तडफडत असल्याने अनेक।लोकांनी आमदारांकडे धाव घेऊन या समस्येबाबत तक्रारी केल्या.यामुळे आमदारांनी पालिकेचे मुख्याधिकारी व पाणीपुरवठा यंत्रणेतील अधिकाऱ्यांना धारेवर धरत दोन दिवसात संपुर्ण शहरात लोकांना प्रत्यक्ष पाणी न मिळाल्यास मी स्वतः पालिकेत येऊन जाब विचारणार असा इशारा दिला आहे.यावर अधिकारी वर्गाने देखील यावर निश्चितच कार्यवाही करण्याची ग्वाही दिली असल्याचे समजते.