लोक न्यूज
लोंढवे, ता. अमळनेर : स्व. आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, लोंढवे येथे दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्य, देशप्रेम, समाजसुधारणा, शिक्षणप्रेम तसेच साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाविषयी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक श्री.डि.बी.सोनवणे सर व मुख्याध्यापक मा. बाळासाहेब जीवन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्तीचा व अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.डि.एम.पवार यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.