लोक न्यूज
अमळनेरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी व नाल्याना पूर येऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. जास्त पाणी असलेल्या ठिकाणी जाऊ नका.घरात पाणी शिरत असेल तर तात्काळ प्रशासनाला कळवा.बोरि नदी काठावरील व पिंपळे नाला परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.
संपूर्ण प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मदत कार्यासाठी फिल्डवर तैनात आहेत. जयनिल फाऊंडेशनच्या वतीने अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.जेथे गरज असेल तेथील नागरिकांनी जयनिल फाऊंडेशनशी संपर्क साधावा.इतर सामाजिक संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे ही विनंती.
आपली सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे.
*अनिल भाईदास पाटील*
आमदार-अमळनेर विधानसभा मतदारसंघ