लोक न्यूज
अमळनेर : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी जयनिल फाऊंडेशन, अमळनेर यांनी सामाजिक बांधिलकी जपत तातडीने मदतकार्य हाती घेतले आहे. फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्त बांधवांसाठी अन्नपदार्थ तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यात आली.
या मदतकार्याचे प्रभावी नियोजन करण्यासाठी आणि मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावी यासाठी रोटरी क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर तसेच अमळनेर तालुका व शहर पत्रकार संघ यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्व संस्थांच्या स्वयंसेवकांनी वितरण व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेत पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत अन्न व पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात विविध सामाजिक संस्था एकत्र येऊन गरजूंना मदतीचा हात देत असल्याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. जयनिल फाऊंडेशनसह सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून, संकटाच्या काळात अशा सामाजिक एकोप्यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळत आहे