लोक न्यूज
अमळनेर, प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूलचा ११८ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल होते.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, डॉ. स्वाती बाविस्कर, मंडळाचे उपाध्यक्ष कमल कोचर, उपाध्यक्षा श्रीमती माधुरी पाटील, विश्वस्त सौ. वसुधरा लांडगे, कार्याध्यक्ष व शाळेचे चेअरमन निरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, ज्येष्ठ संचालक हरीअण्णा वाणी, संचालक प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडे, संचालिका सौ. लीना पाटील, चिटणीस पराग पाटील, सहचिटणीस विजय मांटे, प्राध्यापक प्रतिनिधी दिनेश भालकार, खा.शी.शिक्षक प्रतिनिधी राहुल पाटील, जी. एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.एम.पाटील, डी. आर. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य एच.डी.जाधव, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सपना शिसोदे, राणे प्राथमिकच्या मुख्याध्यापिका भारती आठवले, भंडारकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कैलास पाटील, प्रताप हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एस. बी. निमक, माजी नगरसेवक बाळा कदम, सामाजिक कार्यकर्ते भरत पवार व दीपक पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर शाळेचा लोगो आकाशात सोडण्यात आला. यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. सचिन अहिरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच खानदेश शिक्षण मंडळाच्या शालेय क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रताप हायस्कूलच्या विकासासाठी विविध प्रकारे सहकार्य करणाऱ्या दात्यांचा व हितचिंतकांचाही सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे माजी शिक्षक श्री प्रल्हाद रामदास बाविस्कर यांनी प्रताप हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यासाठी संस्थेला एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी अध्यक्षीय भाषणातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास खांजोडकर व कृष्णा कोळी यांनी केले. आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक प्रतिनिधी दिनेश पालवे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक निखिल पाटील, जयश्री पाटील, लक्ष्मण पाटील, विद्या पटेल, नम्रता दोरकर, सागर पवार व प्रसाद बुवा यांनी शिस्त व नियोजनाची जबाबदारी पार पाडली. शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून वंदे मातरम्ने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण शालेय परिसर आकर्षक रांगोळ्या व फुग्यांच्या सजावटीने नटला होता.