अमळनेर ( लोक न्यूज ) महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार स्वर्गीय लोकनेते अजित दादा पवार यांची जयंती साजरी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी स्व.अजित पवार यांच्या प्रतिमेची भेट तालुक्यातील सर्व कार्यालयाना दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार स्वर्गीय लोकनेते अजित दादा पवार यांची जयंती सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच संस्थांमध्ये अधिकृतपणे व आदराने साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.लोकनेते अजित दादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात, कृषी क्षेत्रात व प्रशासनात तसेच अमळनेरच्या पाडळसरे धरणासह इतर विकासातही दादांनी दूरदृष्टीने प्राधान्याने दिलेले अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील.
याकरिता महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी सुलभ व्हावी व आपल्या कार्यालयात लोकनेते स्व. अजितदादांची प्रतिमा सन्मानाने स्थापित करून जयंती साजरी करता यावी, या उद्देशाने अशोक आधार पाटील,सभापती अमळनेर यांनी अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन आर पाटील ,तहसीलदार रूपेशकुमार सुराणा,प्रांताधिकारी कार्यालय, प्र.गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांना प्रत्यक्ष प्रतिमा भेट देऊन सदर उपक्रमाची सुरुवात केली याप्रसंगी अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे व सहकारी उपस्थित होते. स्व.अजित दादा पवार यांच्या प्रतिमा अमळनेर तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकारी , मुख्याध्यापक, संस्थाचालक,
शासकीय , निमशासकीय कार्यालय , शाळा,संस्था, महाविद्यालय,आरोग्य केंद्र,ग्रामपंचायत कार्यालय कार्यालयास/संस्थेस सप्रेम भेट म्हणून उपलब्ध करून दिली आहे. संबंधितांनी आपल्या कार्यालयात,संस्थेत ही प्रतिमा स्वीकारून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जयंतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आदराने संपन्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करणारे पत्र ही अशोक पाटील यांनी सोबत दिले आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.