लोक न्यूज
अमळनेर : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व लोकनेते स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेर यांच्या वतीने विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच महाविद्यालयांना स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेच्या फोटो फ्रेम भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने सन २०२६ पासून २२ जुलै रोजी स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयांमध्ये स्व. अजितदादा पवार यांची प्रतिमा उपलब्ध व्हावी व त्यांची जयंती सन्मानपूर्वक साजरी करता यावी, या उद्देशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष मनीष पाटील, तालुकाध्यक्ष प्रणव चौधरी व कार्याध्यक्ष हुजैफा पठाण यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा युवकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष गोविंदा बाविस्कर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुनील शिंपी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश पाटील, शहर कार्याध्यक्ष भूषण लोहार, उपाध्यक्ष चैतन्य संदानशिव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष कृष्णा पाटील,राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे,सोशल मीडिया जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदीप सांगोरे,तालुकाध्यक्ष प्रणव चौधरी, शहराध्यक्ष मनीष पाटील, कार्याध्यक्ष हुजैफा पठाण, सोशल मीडिया शहराध्यक्ष रोहित सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोषाध्यक्ष कुशल पाटील, विद्यार्थी सहसचिव चेतन बोरसे, सरचिटणीस तुषार ठाकरे, युवक उपाध्यक्ष वरद कासार, युवक उपाध्यक्ष मोहित शिंदे, युवक चिटणीस विवेक निकम, युवक चिटणीस प्रशांत महाजन, युवक सरचिटणीस अभय महाजन, आदित्य संदानशिव, यश पवार, योगेश पाटील,अनिकेत पाटील, हितेश महाजन, चिन्मय पाटील, उमेश पाटील, भविष्य देशमुख, सुमित मेडिस्कर, प्रशांत चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.