लोक न्यूज
मांडळ, ता. अमळनेर (लोक न्यूज) : "हात सर्वांचा – विकास गावाचा" या सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या ग्रुपतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडळ येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
या कार्यक्रमास ग्रुपचे अध्यक्ष श्री. योगेश सुरेश वानखेडे व सौ. तृप्ती योगेश वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गावातील मान्यवर व ग्रामस्थांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. प्रेमचंद नथ्थू पाटील (माजी प्राचार्य, डायट जळगाव), श्री. भटू सिताराम पाटील (आदर्श शेतकरी), ह.भ.प. डिगंबर महाराज, श्री. सुरेश रामदास वानखेडे, श्री. बापू तुळशीराम कोळी (ग्रंथपाल), श्री. सुरेश संतोष पाटील (पोलीस पाटील), श्री. दीपक बाबूलाल कोळी (अध्यक्ष, एसएमसी), श्री. विशाल पुरुषोत्तम सोनार (उपाध्यक्ष, एसएमसी), श्री. हबीब अय्यूब शेख (सदस्य, एसएमसी), श्री. स्वप्निल नवल पाटील (माजी अध्यक्ष, एसएमसी), श्री. शानाभाऊ बन्सीलाल कोळी (युवा कार्यकर्ता), श्री. जगदीश भटू पाटील (मुख्याध्यापक), श्री. विकास साहेबराव पाटील (उपशिक्षक), श्रीमती मीनाबाई भगवान पाटील, श्रीमती मंगला दयाराम पाटील, श्रीमती संगीता पुंडलिक पाटील आणि श्री. राहुल भगवान सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी "हात सर्वांचा – विकास गावाचा" ग्रुपचे अध्यक्ष श्री. योगेश सुरेश वानखेडे, सौ. तृप्ती योगेश वानखेडे तसेच ग्रुपमधील सर्व सदस्यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळत असून समाजातील दातृत्वाची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.