लोक न्यूज
अमळनेर: - महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज अमळनेर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. 
        राज्य परिषद सदस्य सौ. भारती सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहरात 35 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या "सेवा हीच खरी पूजा" या विचाराला कृतीतून उत्तर देण्याचा हा प्रयत्न होता. 
वृक्षारोपणानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या."विकासासोबत पर्यावरण" हा संदेश देत प्रत्येक कार्यकर्त्याने किमान एक झाड लावण्याचा संकल्प केला. 
       या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यात डॉ अनिल शिंदे,ग्रामिण तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील,शहर सरचिटणीस भरतसिंग परदेशी,शहर उपाध्यक्ष स्नेहा एकतारे,देवस्थान आघाडीचे अध्यक्ष सुरेश बाविस्कर,विधानसभा क्षेत्रप्रमुख शितल देशमुख,माजी शहर अध्यक्ष उमेश वाल्हे,किशोर पाटील,विजय पाटील,संजय सोनवणे,नाना पाटील व रितेश सोनवणे उपस्थित होते. 
       यावेळी बोलताना सौ. भारती सोनवणे म्हणाल्या की, "देवाभाऊ हे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत. त्यांच्या वाढदिवशी केवळ शुभेच्छा न देता समाजोपयोगी कार्य करणे हाच आमचा उद्देश आहे. लावलेली 35 झाडे अमळनेरला हिरवागार करण्यास मदत करतील." 
तर जिजाबराव पाटील* यांनी सांगितले की, "मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही गावागावात सेवा कार्य राबवत आहोत. आजचा वृक्षारोपण हा त्याचाच एक भाग आहे." 
        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.