अमळनेर, लोक न्यूज: विश्वास तात्या फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आयोजकांच्या अपेक्षेपेक्षा दुप्पट प्रतिसाद मिळत तब्बल 198 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविल्याने ही स्पर्धा विशेष ठरली.
आयोजक डॉ. सागर पाटील यांनी सुरुवातीला सुमारे 100 खेळाडू सहभागी होतील, या अंदाजाने नियोजन केले होते. मात्र नोंदणीची संख्या दुपटीने वाढल्याने काही प्रमाणात व्यवस्थापनावर ताण आला. तरीही सर्व खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांनी दिवसभर परिश्रम घेतले.
स्पर्धेत सर्वाधिक 112 खेळाडू अमळनेर येथील होते. त्यामध्ये स्वामी विवेकानंद शाळेचे 10, बोहरा शाळेचे 6, स्टार्स अकॅडमीचे 6, तर इतर 90 खेळाडूंचा समावेश होता. याशिवाय धरणगाव (3), एरंडोल (2), चोपडा (3), भुसावळ (4), रावेर (3), चाळीसगाव (8), धुळे (8), शिरपूर (18), तळोदा (4), नंदुरबार (4), दोंडाईचा (2), बुऱ्हाणपूर (1) आणि खामगाव (1) येथूनही खेळाडूंनी लांबचा प्रवास करून स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडू आणि पालकांना प्रथमच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ नियमांचा प्रत्यक्ष अनुभव आला. Illegal Move, Touch Move, एकाच हाताने सोंगट्या हलविणे व घड्याळ दाबण्याचा नियम, En Passant, Long Castle यांसारख्या महत्त्वाच्या नियमांची माहिती अनेकांसाठी नवी होती. अनेक पालकांना स्विस लीग पद्धती, प्रत्येक फेरीनंतर नवीन प्रतिस्पर्धी कसा ठरतो, पराभवानंतरही सर्व फेऱ्या खेळता येतात, याचीही माहिती या स्पर्धेतून मिळाली.
डॉ. सागर पाटील यांनी सांगितले की, स्पर्धेचा उद्देश केवळ विजेते ठरविणे नव्हता, तर ग्रामीण भागातील खेळाडू आणि पालकांना स्पर्धात्मक बुद्धिबळाचे नियम, शिस्त आणि वातावरणाचा अनुभव देणे हा होता. अनेक लहान खेळाडूंनी अनुभवी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आत्मविश्वासाने खेळ केला, तर पराभवातून शिकण्याची मानसिकता विकसित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही खेळाडूंनी स्वतःपेक्षा लहान वयाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभूत झाल्यानंतर अधिक सराव करण्याचा निर्धार व्यक्त केला, तर पालकांनी आपल्या मुलांना स्पर्धेत खेळताना पाहून समाधान व्यक्त केले.
स्पर्धेच्या यशासाठी आयोजकांनी दिवसभर हॉल व्यवस्थापन, नोंदणी, खेळाडूंच्या शंकांचे निरसन आणि विविध तांत्रिक बाबी सांभाळत अथक परिश्रम घेतले. या अनुभवाबाबत भावना व्यक्त करताना डॉ. पाटील म्हणाले, "डॉक्टर म्हणून गंभीर अवस्थेतील रुग्णाला वाचवल्यानंतर जे समाधान मिळते, त्याचप्रमाणे समाधान या स्पर्धेनंतर मिळाले. स्पर्धा किती यशस्वी झाली हे सहभागी सांगतील; मात्र मला जे द्यायचे होते ते मी दिले आणि जे हवे होते ते समाधान मला मिळाले."
या स्पर्धेत काही खेळाडू विजेतेपद आणि बक्षिसे घेऊन परतले, तर अनेक जण नवीन ज्ञान, आत्मविश्वास, स्पर्धेचा अनुभव आणि बुद्धिबळाविषयी अधिक समृद्ध समज घेऊन घरी परतले. त्यामुळे ही स्पर्धा केवळ एक स्पर्धा न ठरता अमळनेर परिसरातील बुद्धिबळ संस्कृतीला नवी दिशा देणारा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.