लोक न्यूज
अमळनेर : दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. "योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ" या वर्षाच्या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले. विशेष म्हणजे शाळेत त्यासाठी शहरातील प्रसिद्ध योगप्रशिक्षक मा.श्री रघुनाथ चौधरी यांना आमंत्रित करण्यात आले होते.
                  कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रार्थनेने झाली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्रितपणे विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव केला. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि निरोगी जीवनशैली विकसित होते, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
          याप्रसंगी शाळेच्या सचिव सौ. अलका पवार यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगून प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.               विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगासने उत्कृष्टरीत्या सादर केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी सर्वांनी नियमित योग करण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
"निरोगी शरीर, शांत मन आणि सुदृढ राष्ट्र घडविण्यासाठी योग हीच जीवनशैली" हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.