लोक न्यूज
अमळनेर येथील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेच्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थी हितांश निंबा पाटील याने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 98.75 टक्के गुण मिळवले आहेत. या उज्ज्वल यशामुळे शाळेसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हितांश पाटील हा लहान वयातच अभ्यासू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. त्याने सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठिंब्यामुळे हे यश मिळवले आहे. नवोदय परीक्षेत मिळवलेले हे उच्च गुण त्याच्या गुणवत्तेची साक्ष देणारे आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन हेमाकांत पाटील,तसेच मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी हितांशचे कौतुक करत त्याचे अभिनंदन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांनीही त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हितांशच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, भविष्यात तो आणखी मोठे यश संपादन करेल असा विश्वास शिक्षकवर्गाने व्यक्त केला आहे.