लोक न्यूज
अमळनेर नगरपरिषदेत 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. एकूण 383 कोटी 83 लाख 383 हजार रुपयांचा हा विकासाभिमुख अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा रोडमॅप ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची करवाढ न करता विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
मा. आ. शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने 100 बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा ठराव मांडण्यात आला आहे. तसेच शहराच्या सौंदर्यवृद्धीसाठी ‘नमो गार्डन’ संकल्पना साकारण्यात येणार असून त्यासाठी जागा नियोजित केली जात आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
विरोधकांनी पूर्वी मालमत्ता हस्तांतरण शुल्क 2 टक्के केले होते, ते आम्ही कमी करून 1 टक्का केले असल्याचे सांगण्यात आले. तसेच येत्या काही दिवसांत संपूर्ण लोकवर्गणीसह व्याज आकारणी बंद करण्याचा ठराव करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लागणारी गौरी व साहित्य नगरपरिषदेकडून मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. बालक व काही समाज बांधवांना दफनविधीसाठी स्वतंत्र जागेची उपलब्धता करून देण्यात येणार आहे.
नगरपरिषद अनियमितता विभागातील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी सुरू असून, सत्य लवकरच जनतेसमोर आणले जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
पाणीपुरवठा व्यवस्थेचे सुदृढीकरण आणि दीर्घकालीन नियोजनावर भर देण्यात आला आहे. मात्र सध्याचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी काही आधीचे ठेकेदार तसेच विरोधकांकडून जाणूनबुजून प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाईपलाईन फोडणे, मुख्य नळ उघडून लहान पाईपलाईन तोडणे, जादा दाब देऊन पाईपलाईन तोडणे असे प्रकार मागील दोन महिन्यांपासून सुरू असल्याचे सांगण्यात आले. याबाबत सर्व पुरावे गोळा करण्यात आले असून संबंधित ठेकेदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
हा अर्थसंकल्प शहराच्या विकासाला नवे बळ देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करत मा. आ. शिरीष चौधरी यांनी सर्व नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
१) शहरातील पाण्याचे दिवस
• संपूर्ण शहरात ५ दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जातो.
(उदा. सोमवार दिले तर पुढील पाणी शनिवार)
• फक्त ‘मुदंड नगर’ भागात ५ दिवसांनंतर पाणीपुरवठा.
• हद्दीबाहेर परिसरात राजाराम नगर, रुख्मिणी नगर, गोविल नगर, ड्रीम सिटी इ. भागांचा समावेश.
• हद्दीबाहेर सुमारे ८–१० हजार लोकसंख्या असून त्यांच्यावर पाणीपुरवठ्याचा ताण.
• सुमारे ३६०० ही दुप्पट पाणीपट्टी भरत असल्याने हद्दीत व हद्दीबाहेर दोन्ही ठिकाणी एकाच दराने पाणी दिले जाते.
• राजकीय पदाधिकारी व नगरपरिषद पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन पाणी दिवस कमी करण्याचे प्रयत्न सुरू.
२) हद्दीत व हद्दीबाहेर पाणी प्रश्न
• ड्रीम सिटी (हद्दीबाहेर) येथे नवीन व्हॉल्व्ह बसविल्यामुळे पाणी प्रश्न सुटला.
• राजाराम ड्रीम भागात ३ दिवसांपूर्वी नवीन लाईन सुरू केल्याने समस्या कमी झाली.
• जपान जिन ते फाईप स्टोअर, जपान जिन, मेहतर कॉलनी या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यात आला.
३) टप्पी आवर्तन
• उन्हाळ्यात पाणी कपात नाही.
• शहरातील पाणी नियोजनामुळे कालव्यातील पाणी उचल अजून सुरू केलेली नाही.
• तापी दरवर्षी २–३ आवर्तन आवश्यक असते; यावेळी शक्यतो १ आवर्तन घेण्याचे नियोजन.
• त्यामुळे प्रत्येक आवर्तनास ३५–४० लाख खर्च वाचून अंदाजे १ कोटी रुपयांची नगरपरिषद आर्थिक बचत.
• सर्वधर्म सखाराम महाराज यात्रा काळात पाणीपुरवठा नगरपरिषदेमार्फत करण्यात येईल.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर,उपनगराध्यक्ष  प्रशांत निकम, बांधकाम सभापती दादा पवार, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील, शिक्षण सभापती नावेद शेख,नगरसेवक गुलाब पाटील, महेश देशमुख, सूरज परदेशी, भरतसिंग परदेशी, राहुल कंजर उपस्थित होते.

४) नवीन पाणी टाकी (प्रस्तावित)
शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता खालील भागात नवीन पाणी टाक्या प्रस्तावित:
• जलकुंभ क्र. १ – धुळे रोड व पिंपळे रोड परिसर
• जलकुंभ क्र. २ – आर. के. नगर बस स्टॉप मागे, डी.टी. नगर परिसर
• जलकुंभ क्र. ३ – राजाराम नगर परिसर
५) नवीन योजना
नळ कनेक्शन
• शहरात २४–२५ हजार मालमत्ता असून सुमारे १६ हजार नळ कनेक्शन.
• नवीन योजनेत नगरपरिषदेकडून अधिकृत कनेक्शन देऊन अनधिकृत कनेक्शन बंद करणे.
• मालमत्ता व कनेक्शन संख्या समान करण्याचा उद्देश.
• कनेक्शन संख्या वाढवून पाणीपट्टी थकबाकी कमी करणे.
कामाची प्रगती
• लक्ष्मी नगर – ७०% काम पूर्ण
• बंगाली फाईल – ८०% काम पूर्ण
• मुंडा नगर – ६०% काम पूर्ण
• या भागांत टप्प्याटप्प्याने २ महिन्यांत पाणी सुरू करण्यात येईल.
• सध्या ६ टीम योजना राबवत असून काम प्रगतीपथावर आहे.
६) उद्दिष्ट
• पाणी बचत करणे.
• नियोजनबद्ध पाणीपुरवठा करून सर्व भागांना समप्रमाणात पाणी देणे.
• आर्थिक बचत व महसूल वाढ साध्य करणे.