वैजापूर(लोक न्यूज )
येथील पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयाच्या तंत्रज्ञानी शिक्षिका सुवर्णा मंगेश पाटील(बोर्डे)यांच्या संगणक शास्त्र व कोडिंग क्षेत्रातील अति उल्लेखनीय कार्या बद्धल तसेच विद्यार्थ्यांना संगणकचे अत्याधुनिक तंत्र शिकविले त्या प्रित्यर्थ कोड  ऑफ एनहन्स लर्निंग संस्थेच्या वतीने  पांच लॅपटॉप देऊन त्यांचा यथोचित गौरव , शनिवार(ता,१४) रोजी सेवा,निवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत
यांच्या हस्ते करण्यात आला.श्री.राजपूत यांनी बोर्डे यांचे अभिनंदन करीत सदरील ज्ञान,माहिती,कॉम्पुटर
माहिती, विद्यार्थी पर्यंत पोहचविण्यासाठी तालुक्यातील सर्व शाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांना या कॉम्पुटर योजनेचची माहिती व पीएमश्री योजना शिक्षण विभाग माहिती समजावून सांगने गरजेचे आहे.असे प्रतिपादन केले.या प्रसंगी पालिका पर्यवेक्षक, बी.बी.जाधव, मुख्या ध्यपिका नीता पाटील,  स्वतः सुवर्णा बोर्डे, राजश्री बंड,ज्योती दिवेकर,लता सुखासे,पल्लवी टाकळकर, ज्योती दिवेकर,सुनीता वसावे,सुभाष गोमलाडू,संदीप शेळके,श्रीमती राजपूत,
यांनी परिश्रम घेतले. पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयातून या योजनेअंतर्गत चे सर्व उपक्रम ऊदयाच्या विकसनशील शाळेसाठी आदर्श ठरणार आहेत.या शाळेचे विद्यार्थी संगणक क्षेत्रात आघाडीवर
आहेत.तालुक्यातील सर्व  जि.प.प्राथमिक शाळेत ही संगणकीय माहिती पुरविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत असे राजपूत बोलले.पर्वेक्षक बी.बी,जाधव व नीता पाटील यांनीही समयोचित भाषण केले.सूत्र संचलन व आभार राठोड सर यांनी मानले