लोक न्यूज
अमळनेर (जि. जळगाव): ता. अमळनेर येथील निम्न तापी प्रकल्प पाडळसे या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार तसेच जलसंपदा मंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, निम्न तापी प्रकल्प पाडळसे हा तापी नदीवरील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो उत्तर महाराष्ट्रातील शेती, पिण्याचे पाणी व औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा या तालुक्यांतील सुमारे ४३ हजार ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासोबतच १७.१ टीएमसी पाणी अडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. औद्योगिक क्षेत्रासाठीही पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पासाठी ४ हजार ८९० कोटी रुपयांची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या मान्यतेसाठी दिवंगत अजितदादा पवार यांनी विशेष पाठपुरावा केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर प्रकल्पास केंद्रीय जलआयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले. राज्य वित्त आयोगामार्फत राज्याच्या आर्थिक सहभागाची हमी मिळाल्यानंतर केंद्रीय जलआयोगाने प्रकल्पास शिफारस देत तो केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे पाठविला.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने विशेष अधिकार समितीच्या मान्यतेनंतर प्रकल्पाचा समावेश Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana मध्ये केला आहे. या प्रकल्पाचे जलपूजन दिवंगत अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे ते शक्य झाले नाही.
त्यांच्या पाठपुराव्यामुळेच प्रकल्पाला गती मिळाली आणि तो पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची कृतज्ञतापूर्वक नोंद म्हणून या प्रकल्पाला “अजितदादा पवार निम्न तापी प्रकल्प पाडळसे, ता. अमळनेर, जि. जळगाव” असे नाव देण्यात यावे, अशी विनंती आमदार अनिल पाटील यांनी शासनाकडे केली आहे.