लोक न्यूज
व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुंदडा ऑप्टिकल्सचे संस्थापक माननीय श्री. अभिनेय मूंदडा यांना “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड 2025” प्रदान करून गौरविण्यात आले. 
आपल्या कार्यक्षेत्रात सातत्य, गुणवत्ता आणि ग्राहकाभिमुख सेवेमुळे श्री. अभिनेय मूंदडा यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऑप्टिकल्स व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान, विश्वासार्ह सेवा आणि उत्कृष्ट दर्जा यांचा सुरेख संगम साधत त्यांनी मुंडाडा ऑप्टिकल्सला यशाच्या शिखरावर नेले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.
पुरस्कार प्रदान करताना आयोजकांनी सांगितले की, “आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हाच या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे, आणि श्री. अभिनेय मूंदडा हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत.”
या सन्मानामुळे श्री. मूंदडा यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, ग्राहक तसेच संपूर्ण व्यावसायिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात आणखी प्रेरणा मिळून ते नव्या उंचीवर झेप घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
श्री. अभिनेय मूंदडा यांना या गौरवशाली यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.