लोक न्यूज

आज दिनांक २४/१२/२०२५ वार बुधवार रोजी जि. प. प्रा. शाळा उदयनगर येथे बालकांचा  आनंद मेळावा अतिशय उत्साहात पार पडला.... या मेळाव्यास सर्वांचे लाडके सरपंच प्रकाश वाघ सामाजिक कार्यकर्ते राजेश वाघ ग्रा. प सदस्य राजेंद्र पाटील, सुदाम सोनवणे,माजी उपसरपंच सोनू पाटील, माजी सदस्य सदस्य सतीश पाटील,योगेश पाटील, डॉ जितेंद्र पाटील व ग्रा. प कर्मचारी जितेंद्र पाटील,नरेंद्र पाटील, सुभाष पाटील,सुधीर सोनवणे ग्रामसेविका सोनी पाटील, तसेच शा. व्य. समितीचे अध्यक्ष महेश पाटील व त्यांची टीम तसेच गावातील सर्व सन्माननीय आजी-माजी पदाधिकारी जेष्ठ नागरिक शिक्षण प्रेमी आजी- माजी विद्यार्थी, तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व उपस्थित गावकरी बांधव यांनी बाल चिमुकल्यांचा खाऊ खरेदी करत मनसोक्त आनंद घेतला. आणि शाळेतील सर्वच चिमुरड्यांना आनंदित करून आजचा आनंद मेळावा खऱ्या अर्थाने यशस्वी केला. त्याचप्रमाणे  सोनू पाटील यांनी जारच्या पाण्याची व्यवस्था केली. त्यांचेही शाळेने मनःपूर्वक आभार मानले व बाल आनंद मेळाव्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले शाळेचे जेष्ठ शिक्षक संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले व सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र मासुळे यांनी केले शेवटी नितीन शिंदे सरांनी आभार मानत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बाल आनंद मेळाव्याची सांगता करण्यात आली .....