लोक न्यूज (अमळनेर)
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, मोबाईल आणि टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी तसेच मुलांमधील वाढती हिंसक वृत्ती कमी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या गायन-वादन कार्यशाळेचा समारोप उत्साहात झाला.
या कार्यशाळेत संगीत शिक्षक तुषार पुराणिक यांनी दहा दिवस आपली संगीत सेवा दिली. तसेच बेथेल चर्चचे फादर गावित सर आणि खानदेशातील सुप्रसिद्ध बासरीवादक व प्रचारक योगेश पाटील सर यांनी दोन सत्रांमध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांना संगीतविश्वाचा जवळून परिचय करून दिला.
या कार्यशाळेची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील आणि शिक्षणतज्ञ तसेच रंगकर्मी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. संचालक मंडळाने या उपक्रमात भरीव योगदान दिले. तसेच तीनही शाळांचे मुख्याध्यापक अनिता बोरसे, सुनील पाटील, आणि संजीव पाटील यांनी विद्यार्थ्यांना कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले व गावातील इतर शाळांतील संगीतप्रेमी विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाचा प्रचार केला.
दहा दिवस चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी बासरीवर राष्ट्रगान वादन, तबल्याचे प्राथमिक बोल आणि कीबोर्डचे शिक्षण घेतले. या संगीतमय प्रवासाचा मुलांनी मनापासून आनंद घेतला.
दिनांक २६ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या कार्यशाळेचा समारोप ४ नोव्हेंबर रोजी रंगकर्मी संदीप घोरपडे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “संगीत हे जीवनातील ताणतणाव दूर करणारे आणि मन:शांती देणारे श्रेष्ठ साधन आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलावंत दडलेला असतो, त्याला योग्य दिशा मिळाल्यास जीवन अधिक सुसह्य होते.”
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी आणि पुढील कला प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यशाळेत वैभव भैय्यासाहेब पाटील, मीत योगेश पाटील, निलय प्रसाद ओवे, अर्चना निंबा चव्हाण, विआन स्वप्नील पाटील, अन्वी पाटील आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत संगीताची ओळख करून घेतली आणि भरभरून आनंद लुटला.