प्रा. सौ. योगिता सयाजीराव कापडणेकर (पाटील)
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ७ अ (महिला राखीव) या मतदारसंघात प्रचाराची चुरस वाढत असून उमेदवारांकडून मतदारांपर्यंत विविध आश्वासने व योजनांची माहिती पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रभागातून प्रा. सौ. योगिता सयाजीरााव कापडणेकर (पाटील) यांनी जनसंपर्क मोहिमेला वेग देत आपले प्रचार पत्रक प्रसिध्द केले आहे.
पत्रकात माजी नगराध्यक्षांसह स्थानिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील काही मान्यवरांनी दिलेले शुभेच्छा संदेश प्रकाशित करण्यात आले आहेत. स्वतःला अपक्ष उमेदवार म्हणून सादर करत त्यांनी ‘माझा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष’ या घोषवाक्याद्वारे स्थानिक विकास आणि जनसंपर्काला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे.
प्रभागासाठी मांडलेली प्राधान्ये
कापडणेकर यांनी पत्रकात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काही प्रमुख उद्दिष्टे जाहीर केली असून त्यात—
• नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा
• रस्ते, नाले व सांडपाणी व्यवस्थेचा दर्जेदार विकास
• स्ट्रीटलाईटची सुधारणा आणि नवीन बसवणी
• युवकांसाठी क्रीडा सुविधांचा विस्तार
• वरिष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त शासकीय योजना उपलब्ध करून देणे
• प्रभागात स्वच्छता, सुरक्षितता आणि सुशोभीकरणाच्या उपक्रमांना चालना
यांचा समावेश आहे.
प्रजासहभागातून विकासाचा संकल्प
उमेदवारांनी नागरिकांशी सतत संवाद साधत प्रभागातील अडचणी त्वरित सोडवण्याची हमी पत्रकाद्वारे दिली आहे. पारदर्शक कारभार आणि उपलब्धतेवर आधारित कामकाज करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मतदारांना आवाहन
प्रचार पत्रकाच्या शेवटी कापडणोकर यांनी मतदारांशी संवाद साधत, “सुरक्षित, स्वच्छ आणि सुशोभित प्रभाग हा आमचा एकमेव संकल्प” असे नमूद केले आहे. तसेच प्रभाग क्रमांक ७ अ येथील नागरिकांनी त्यांच्या ‘पंखा’ या निशाणीवर मतदान करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.