अमळनेर (लोक न्यूज) :
भद्रा प्रतीक मॉल ते बजरंग पेट्रोल पंप या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर यांनी या गंभीर समस्येकडे केवळ औपचारिकपणे लक्ष दिल्याचे दिसत आहे.
सदर खड्ड्यांची दुरुस्ती करताना विभागाने डांबर किंवा खडीचा वापर न करता, फक्त बारीक कच व माती टाकून ते बुजविण्याचे काम केले आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या मनात विभागाविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या कामाची तुलना “लहान मुलाला चॉकलेट देऊन समाधान केल्यासारखी” केली आहे.
केवळ नावापुरते आणि तात्पुरते काम करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही दिवसांतच हे खड्डे पुन्हा पूर्ववत होतील, असा नागरिकांचा अंदाज आहे.
संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन या रस्त्यावरील सर्व खड्ड्यांची दर्जेदार पद्धतीने, योग्य डांबर व खडी टाकून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

.          दुसऱ्या दिवशी केलेले काम

• रस्ते दुरुस्ती की डोळेफसवे काम? — डांबराऐवजी खड्ड्यांमध्ये टाकला फक्त कच!
• भद्रा प्रतीक मॉल ते बजरंग पेट्रोल पंप मार्गावरील रस्त्यांची दुर्दशा — विभागाकडून केवळ दिखाऊ डागडुजी!
• जनतेचा संताप उसळला — अमळनेर PWD कडून खड्ड्यांवर केवळ कचफेक!
• खड्डे बुजले की प्रशासनाची जबाबदारी बुजली? — डांबराशिवाय केवळ कचाने काम उरकले!


काल प्रकाशित झालेले  लोक न्यूजची बातमी