लोक न्यूज
🌾 शेतकरी आक्रोश मोर्च्यानंतर वादाचा भडका
दि. १५ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने अमळनेर येथे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, आणि शासकीय मदतीचे वितरण तातडीने व्हावे या मागण्या करण्यात आल्या. मोर्च्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात चर्चा सुरू असताना माजी खासदार उन्मेष पाटील यांनी सरकारी अधिकारी, आमदार आणि खासदारांविषयी अत्यंत अशोभनीय आणि अपमानास्पद भाषेत वक्तव्य केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
या वक्तव्याची माहिती बाहेर येताच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला आणि शहरात निषेधाची लाट पसरली.
🚧 महायुतीचे आंदोलन — "लोकशाहीचा अपमान चालणार नाही!"
काल 5वाजता  महाराणा प्रताप चौकात कार्यकर्त्यांनी जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. "लोकप्रतिनिधींचा अपमान म्हणजे लोकशाहीचा अपमान", "शेतकऱ्यांच्या नावाखाली गलिच्छ राजकारण नको" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.