अमळनेर, दि. २९ ऑक्टोबर (लोक न्यूज):
भारताचे पहिले गृहमंत्री व ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे मा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे “वॉक फॉर युनिटी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उपक्रम दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता शहरातील महाराणा प्रताप चौक येथे पार पडणार आहे. देशातील एकता, अखंडता आणि सामाजिक सलोखा दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, शहर व तालुक्यातील नागरिकांनी यात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.
या कार्यक्रमात अमळनेर शहर व तालुक्यातील सर्व सन्माननीय नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालये व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार व युवक वर्ग सहभागी होणार आहेत.
“वॉक फॉर युनिटी”च्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांमध्ये बंधुता, ऐक्य, सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कार्यक्रमाचे प्रारंभिक ठिकाण महाराणा प्रताप चौक असून, शहरातील मुख्य मार्गांवरून फेरी काढण्यात येईल.
या प्रसंगी अमळनेर पोलिसांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशाच्या ऐक्याचे प्रतीक ठरणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
— दत्तात्रय निकम
पोलीस निरीक्षक, अमळनेर पोलीस स्टेशन