लोक न्यूज
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) अल्पसंख्यांक विभागाच्या आढावा बैठकीत आमदार अनिल भाईदास पाटील यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान द्यावे, असा एकमुखी ठराव पारित करण्यात आला.
ही बैठक पक्षाचे राज्यप्रमुख ॲड. नाझेर काझी यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा कार्यालयात उत्साहात पार पडली.
बैठकीच्या प्रारंभी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यानंतर अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि पक्षविस्ताराच्या उपक्रमांवर सखोल चर्चा झाली. बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत अमळनेर शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खाटीक, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अलीम मुजावर, शहराध्यक्ष कलीम शेख यांनी आमदार पाटील यांना मंत्रिपद द्यावे, या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शविला. उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकले.
बैठकीस मा. मंत्री गुलाबराव देवकर, आमदार मनीष जैन, जळगाव लोकसभा अध्यक्ष संजय पवार, रावेर लोकसभा अध्यक्ष उमेश नेमाडे, तसेच पक्ष नेत्या प्रतिभा शिंदे उपस्थित होत्या.
बैठकीचे सुत्रसंचालन संयोजकांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले.
बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्वांनी “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंदाबाद”, “अजितदादा पवार यांचे नेतृत्व अमर रहे”, आणि “दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांना मंत्री करा” अशा घोषणा देत उत्साहाने सभा संपवली.
बैठकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले.