लोक न्यूज
यंदाच्या दिवाळीत ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. 1988 पासून सुवर्ण व्यवसायात विश्वासार्ह नाव असलेल्या एस. के. ज्वेलर्स या प्रतिष्ठानाची शाखा क्रमांक 2 आता अधिक आकर्षक रूपात ग्राहकांच्या सेवेत सज्ज होत आहे.या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन 18 ऑक्टोबर 2025, धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर करण्यात येणार आहे. उद्घाटनानिमित्त ज्वेलर्सतर्फे ग्राहकांसाठी खास लकी ड्रॉ योजना जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेनुसार उद्घाटनापासून पुढील 15 दिवसांच्या खरेदीवर ग्राहकांना 24 कॅरेट सोन्याची नाणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.
लकी ड्रॉ अंतर्गत बक्षिसांमध्ये प्रथम विजेत्यास 10 ग्रॅम सोने, द्वितीय विजेत्यास 5 ग्रॅम सोने, तृतीय विजेत्यास 3 ग्रॅम सोने, चौथ्या विजेत्यास 2 ग्रॅम सोने, तर पाचव्या विजेत्यास 1 ग्रॅम सोन्याचे नाणे देण्यात येईल. याशिवाय अन्य 10 भाग्यवान विजेत्यांना अर्धा ग्रॅम सोन्याचे नाणे देण्यात येणार आहे.
फक्त 15 दिवसांसाठी लागू असलेल्या या ऑफरमुळे ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
याशिवाय, एस. के. ज्वेलर्सने “धनलक्ष्मी संचय योजना” जाहीर केली असून, या योजनेअंतर्गत दरमहा 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक केल्यास 20 ग्रॅम 24 कॅरेट सोने मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
ग्राहकांच्या विश्वासावर आधारित सेवा आणि आकर्षक ऑफर्समुळे या नव्या शाखेच्या उद्घाटनाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.