लोक न्यूज
अमळनेर : सुमठाणे आणि जानवे शिवारातील दुहेरी खून प्रकरणातील आरोपीने आणखी काही गुन्हे कबुल केल्याचे समजते. त्याचे अनेक महिलांशी संभाषण झाल्याचे उघडकीस आल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अधिक तपासासाठी तीन पथके रवाना केली आहेत.
        अनिल संदानशीव  पोलिसांना दररोज वेगवेगळ्या जबाबातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. अनिल पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करीत असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली आहे. सुरुवातीला महिलांशी शारीरिक संबंध करताना असक्षम ठरल्याने त्या  मला नपुसक म्हणून हिणवत असल्याने त्यांचे खून केले असे जबाब दिले होते. पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली आहे. तसेच मृत महिलेचे हाडे व महिलेच्या मुलाचे रक्ताचे नमुने घेऊन डीएनए चाचणी साठी पाठवण्यात आले आहेत.
    तर दुसरीकडे एलसीबी देखील सखोल तपास करत असताना आरोपीने आणखी काही गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे समजते. तसेच आरोपीचे सिडीआर काढल्यानन्तर त्याने अनेक महिलांशी संभाषण केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आणखी काही महिलांचा त्याने खून केला आहे का ? या तपासासाठी एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने अमळनेर येथे  डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याशी चर्चा करून अधिक तपासासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना केली आहेत. अनिल ने संभाषण केलेल्या महिला जिवंत आहेत का ? की मृत याबाबत देखील खात्री करून त्याचा संपर्क कोणत्या उद्देशाने  होत होता याचीही माहिती काढणे सुरू आहे.