लोक न्यूज

मुंदडा फाऊनडेशन संचलित श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल अमळनेर येथे आषाढी एकादशी निमित्त दिनांक 05/07/2025 रोजी शाळेच्या चिमुकल्यांनी ग्लोबल व्ह्यू स्कूल ते वाडी संस्थान पर्यंत भव्य दिंडी काढली. या दिंडीत प्ले - ग्रुप, इयत्ता 1 ली व इयत्ता २ री च्या विद्यार्थी व विद्यार्थीनीनी सहभाग घेतला. जसे आषाढ महिना लागला म्हणजे अवघ्या महाराष्ट्राला विठ्ठल भेटीची आस लागते तसेच आमच्या ग्लोबलच्या चीमु्कल्यानाही  विठ्ठल भेटीची आस लागली व या चिमुकल्यांनी दिंडीत अतिशय उत्साहात सहभाग घेतला. सदर दिंडी हि मुलांमध्ये धार्मिक तसेच सांस्कृतिक वारसा जोपासणे तसेच आपल्या देशातील परंपरेची व विविधतेची माहिती या चिमुकल्यांना असावी या हेतूने सदर दिंडीचे आयोजन करण्यात आले, दिंडी मध्ये विठ्ठल-रुख्मीणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच इतर अनेक संतांच्या वेशभूषा या चिमुकल्यांनी केल्या होत्या, ढोल-ताशे, टाळ-मृदुंग यांच्या साथीने अतिशय उस्ताहत हि दिंडी, वाडी संस्थानात पोहोचली. सदर विद्यार्थ्यांनी वाडीत मंदिरा समोर आपले विठ्ठल नामावर आधारित नृत्य कौशल्य दाखविले, या दिंडी साठी प्ले - ग्रुपच्या शिक्षिका, व सर्व इयत्ता 1 ली व दुसरीच्या शिक्षिका - शिक्षक तसेच क्रीडा शिक्षक  यांनी परिश्रम घेतले.
                    सदर दिंडीसाठी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.ओमप्रकाश मुंदडा, चेअरपर्सन सौ. छायाभाभी  मुंदडा, सचिव श्री. अमेय मुंदडा, सह सचिव श्री. योगेश मुंदडा, श्री. नरेंद्र मुंदडा, श्री. राकेश मुंदडा, श्री. पंकज मुंदडा, अॅडमिनिस्ट्रेटर सौ. दीपिका मुंदडा, सर्व पदाधिकारी, प्राचार्य श्री. लक्ष्मन सर, प्रायमरी प्राचार्या सौ. विद्या लक्ष्मन, प्री-प्रायमरी को-ऑडीनेटर सौ. योजना ठक्कर, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन सर्व चिमुकल्यांचे कौतुक केले.