लोक न्यूज

लोक सेवा मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे रुग्णमित्र ही रुग्णसेवा करीत आहोत.
    १ जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स डे संपूर्ण भारतात साजरा केला जातो डॉक्टरांच्या कार्याची प्रशंसा करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला.
यांचे रुग्णसेवा साठी समर्पण तसेच देश व समाजासाठी देत असलेल्या अमूल्य सेवेचा सत्कार  करण्यात आला.
     या कार्यक्रमासाठी प्रमुख  सर्व रुग्ण मित्रांनी डॉ.  जी.  एम.  पाटील सर ( वैद्यकीय अधीक्षक ) व सर्व वैद्यकीय अधिकारी यांना प्रत्येक बाह्यरुग्ण विभाग व अंतररुग्ण विभागातील डॉक्टरांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या सेवेचा सत्कार  करण्यात आला.
       येथे रुग्णमित्र हे उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मदत व मार्गदर्शन केले जाते. चिट्टी कुठे काढायची,  कोणता ओपीडी नंबर कुठे, कोणता वॉर्ड कुठे आहे,  कोणती तपासणी कुठे होते, रक्ताची गरज असेल तर काय करावे अशा विविध गोष्टींची निस्वार्थपणे मदत व मार्गदर्शन करण्यात येते. यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार मिळतो.
       कार्यक्रमासाठी खालील रुग्णमित्र उपस्थित    होते  श्री प्रदीपजी साळवी, श्री भरतसिंग परदेशी, श्री तुषारजी कोळी, श्री धनराजजी पाटील, श्री महावीरजी मोरे, श्री सचिनजी शिंदे , श्री अनिलजी  घासकडबी, श्री चंद्रशेखरजी ब्रम्हे,  श्री डी डी पाटील सर श्री मनोजजी शिंगणे ,  डॉ. शशिकांत चिंतामणी ( देवगिरी प्रांत रुग्णमित्र पूर्णवेळ ) व सर्व रुग्णमित्र उपस्थित होते.